पुन्हा

Started by Prasad.Patil01, March 25, 2018, 08:23:01 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

एकदा घरटं सोडलेली पाखरं,
परततांना पाहिलीत का ?
झाडाची गळली पानं ती,
परत कधी जुळलीत का ?

मग
तडा गेलेल्या काचापरी
विखुरलेलं नातं हे मग
मी का असं सावरत असतो ?
पुन्हा ते नातं तसच व्हावं
हा प्रयत्न उगा का करत असतो ?

एकदा गेलेले क्षण खरच
पुन्हा नाही येतात का ?
अनुभवलेलं सर्व काही
विसरून असं जातात का ?

पुन्हा ते तसचं तशीच तू
पुन्हा तशीच माझी तू
पुन्हा परत येशील का ?
पुन्हा तोच निरुत्तरीत प्रश्न
पुन्हा तू माझी होशील का ?

                  प्रसाद पाटील
                  (स्वलिखित)
                ८९७५७४०१०८
                २५/०३/२०१८