वारा

Started by Deokumar, March 26, 2018, 08:23:26 AM

Previous topic - Next topic

Deokumar

वारा...

हा बेधुंद वारा
वाहतोय कसा
आपल्याच तालामधी
झुलतोय कसा

ना पर्वा, ना तमा कशाची
चढली धुंदी वाहण्याची
सुगंध घेऊनि खांद्यावर
परीसर मोहवितो हा कसा

इकडून तिकडे हिंडतोय सारा
नाही थकत हा मारुन येरझारा
सतत त्याचे येणे जाणे
स्पर्शाने त्याच्या फुलवी जीवन गाणे

राग येता रौद्र रुप घेई
अडवता कुणी उडवत घेऊन जाई
रागाने त्याच्या सारी धरती कापते
मोठमोठ्या शक्ती त्याच्या पुढे झुकते
                           :-देवकुमार
https://dattagumatkar.blogspot.in