उपकाराचं ओझं

Started by Deokumar, March 26, 2018, 09:48:01 PM

Previous topic - Next topic

Deokumar

उपकाराचं ओझं

हे उपकाराचं ओझं
घेताना किती हलकं असत
परतफेड करताना मात्र
पाठीचा कणा मोडून टाकतं

धाप लागते या जीवाला
हे ओझं पेलताना
ओलं होतय शरीर घामाने
हे उपकाराचं ओझं सांभाळताना

वाटलं होतं मदत होईल
फुलवण्यास हे जीवन
ओझ्याने या उपकाराच्या
कोलमडून गेलय सारं तन-मन

ध्येयाकडे जात असताना
याचं ओझ्यानं मागे खेचलं
जीवनाची घडी बसवता बसवता
मात्र सारं काही विस्कटलं
                   :-देवकुमार
https://dattagumatkar.blogspot.in