प्रेम

Started by sneha31, March 27, 2018, 02:20:00 PM

Previous topic - Next topic

sneha31

ह्या नजरेला सतत असते तुझीच वाट
कळत नाही तुझ्या स्वप्नात कधी होते पहाट
तुझ्या सोबत असतांना असतो तो प्रेमळ क्षण
तुझ्या शिवाय कुठेच लागत नाही माझ मन

डोळ्यात तुझ्या बघताच हरवते माझे भान
हास्य तुझ्या गालावर बघूनी हस्ते मी ही छान
मदमस्त होऊनी रंगली तुझ्या प्रेमात
नको सोडू मला एकट परक्या या जगात

स्पर्श तुझा तो  मला वेड लावूनी गेल
जणू मोहापाषात तुझ्या अडकून गेलं
तुझ्याशिवाय जगणं आता कठीणच झालं
तुझ्यावर प्रेम करून मी काय गुन्हा केल?

प्रेमाच्या या खेळात सहभागी कधी व्हायचे नव्हते
करण या जन्मी मी तुझी कधीच होणार नव्हते
नकळत जीव माझं तुझ्या श्वासात अडकलं
तुझ्या प्रेमाची जागा माझ्या मनात घर करून गेलं

स्नेहा