माणूसकी

Started by snangareopan@gmail.com, March 30, 2018, 02:56:33 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

माणूसकी
कसावी  म्हणतो  मी
इथे  माणुसकीची सेंद्रियता,
या सदगुणांवर रसायनांचा
झाला भडीमार फार आता .

आज समृद्धीच्या डोहाळ्यालाही
काळ्या डांबराचा आहेर आलाय ,
जणू विकासाच्या नावाखाली
वावराचा बलात्कार झालाय .

विरल्यात आकाशात किंचाळ्या
पसरली आहे स्मशान शांतता ,
टांगली अब्रूची लख्तरे वेशीला
कुठली माणसं  अन कुठली मानवता.

उर फोडून फोडावा टाहो नशिबाने
कि टिपे माणुसकीची डोळ्यात जीरपावी ,
सटवीच्या लेखणीला आज
माणुसकीने एवढी साथ द्यावी.
   ----------- सोपान नांगरे
                 भारती विद्यापीठ