एक तरी मुलगी असावी ..... ,

Started by snangareopan@gmail.com, March 31, 2018, 10:00:35 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

एक तरी मुलगी असावी,
हळूच जवळ येऊन बसावी ,
मनातली गुपितं हळूच तिने
कानामध्ये सांगावी.

एक तरी मुलगी असावी,
गालातल्या गालात हसावी,
कधीतरी भावनेच्या भरात
गळ्यात मिठी मारावी.

एक तरी मुलगी असावी,
साजरी गोजरी दिसावी,
तिचे लाड पुरवताना
मात्र तारांबळ उडावी.

पण अशी लेक देवा,
माझ्या पोटी येते,
तरी पण का कोणास ठाऊक
वेगळे तिचे मज़े नाते.

एक दिवस अचानक ती
मोठी होऊन जावी,
बाबा तुम्ही दमला का?
नकळत बोलावी अन
एक तरी मुलगी असावी ..... ,
             
           सोपान नांगरे
         एम फार्मसी