माणुसकी मरायला हवी...........

Started by SHASHIKANT SHANDILE, April 04, 2018, 10:59:51 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

घे कापून गळा मानवतेचा
माणुसकी मरायला हवी
धर्म जात करत जगू आपण
परंपरा ही चालायला हवी

अजून होतील मतभेद देशात
स्वार्थी राजनीतीचा जिथे पाया
एक तुपाशी एक उपाशी जगतो
याच लफडयाची सारी ही माया

चला बघूया माणूस जगतो किती
की मरते माणुसकी त्या आधी
मी ही याच तमाशाचा एक हिस्सा
मी ही तर मरेनच कधी ना कधी

समता बंधुता अशी जगणार नाही
अश्याने कुणाचे जमणार नाही
चला मोडुया मनगटी माणुसकीची
जातीचं लफडं असं सरणार नाही
---------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!