धग

Started by sanjweli, April 04, 2018, 06:00:34 PM

Previous topic - Next topic

sanjweli

व्यथा जीवनाची आता
सांगायची  कुणा
कथा वेदनेची पहा
दावायची कुणा

खोट्या फुंकरेची आशा आता
पहा गेली पुरती लयाला
तीखट मीठ जखमेवरती टाका
गरीबाची फिकीर इथं नाही कुणाला

बाजार मांडला सारा
राम नाही कश्यात तो कसला
दिखाऊ माल सगळा
साराच पोकळ वासा

धगधगते शापित ललाटरेषा
होरपळल्या सा-या पाऊलवाटा
कुठाय अच्छा दिनाचा वादा
रित्याहाती मोकळा उभा
कफल्लक शेतकरी माझा .

©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
©sanjweli
9422909143