ओळख

Started by sanjweli, April 04, 2018, 06:07:48 PM

Previous topic - Next topic

sanjweli

दि.२३/०२/२०१८

सौंदर्याचे पहारे सारे
पहा आहेत कितीतरी

कुंतलाची फौज सारी
चहुबाजुनी पहारा करी

सांग ही  किमया सारी आहे तरी कोणती
सुर्य चंद्र ग्रहण यांनाही लागते

कसली न तुला भीती
लावण्य तुझे देखणे

सारे फिके तुझ्यापुढे
सांग तू! वर्णु तुझी महती किती

भाषा नजरेची बघ
आहे जरासी वेगळी

लवलवते पापणी
दोन्ही धृव्वे आता मोकळी

सांगते गुज ओळख काहीतरी
भेट आपली साताजन्माची.

© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील.
©sanjweli