बेगडी भास

Started by शिवाजी सांगळे, April 04, 2018, 10:50:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बेगडी भास

आयुष्या तू तकलादू फास आता
मूळ विसरलो बेगडी भास आता

मायाजाल इथे खरा किती खोटा
भेटतील हवा फुंके रास आता

जगता लपवून चेहरा खरा इथे
मुखवटेच होतात रे खास आता

वांझोट्या नभाला पुळका धरेचा
घेतो करूनी उगाच त्रास आता

हवेत कशाला गोडवे खोट्याचे
बोलताच खरे म्हणती बास आता

पाठ त्याची थोपटून तोच घेतो
लाभतो कुणास हा विश्वास आता

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar


शिवाजी सांगळे

मनस्वी आभार देवकुमारजी...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९