*** सखे तुझी आठवण ***

Started by धनराज होवाळ, April 08, 2018, 10:27:12 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

#सखे_तुझी_आठवण

सखे तुझी आठवण,
जणु भिरभरणाऱ्‍या वाऱ्‍यासारखी..

कधी येते ती झुळूक वाऱ्‍याची,
हवी हवीशी वाटणारी..
तर कधी येतो तो बेभान वारा,
अंगावर धावून येणारा..!!

सखे तुझी आठवण,
जणु बरसणाऱ्‍या पाऊसासारखी..

कधी येतो तो रिमझीम,
डोळ्यातुन थेंब पाडणारा..
तर कधी कधी येतो तो मुसळधार,
डोळ्यात अश्रूंचा महापूर आणणारा..!!

सखे तुझी आठवण,
जणु ऊन सावल्यांचा खेळ..

कधी सावलीसारखी शांत येते,
अन् चेहऱ्‍यावर गोड हास्य देऊन जाते..
तर कधी येते ऊन्हासारखी कडक,
तु दुर असल्याची जाणीव करुन देते...!!!

सखे तुझीच आठवण...
-
#प्रेमवेडा_राजकुमार
( #धनराज_होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.