मुलांची हरवत चाललेली आई

Started by siddheshwar vilas patankar, April 09, 2018, 05:26:40 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई

पण माझी तू फक्त आई आहेस

मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस

हवं नको ते सारं बघायचीस

मी कर्तासवरता झालो

नि तू दूर दूर गेलीस

इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही

मी ओरडतो, घशाला कोरड पडते

बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई  "

तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस

एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस

प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस

पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस

देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस

तो आहे कि नाही हे माहीत नाही

पण एकमात्र नक्की आहे या जगात

आणि ती म्हणजे " मुलांची हरवत चाललेली आई "

" यशस्वी बाई " हे नाव सोडून कधीतरी येशील आणि वेळ देशील

आणि परत बनशील ना आम्हाला हवी असलेली " आमची आई "


सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C