तुला जमते

Started by niteshk, April 10, 2018, 11:30:23 PM

Previous topic - Next topic

niteshk

प्रयत्न करतो भिजण्याचा, तुझ्यासवे पावसात
चिंब होऊनही, कोरडे राहणे तुला जमते

नाती राहतो मी, खूप जपत उगाच
कळूहि न देता सारे, तोडणे तुला जमते

धडपडतो मी अजून, तुझ्याजवळ येण्यासाठी
सोबतीचा भास दाखवून, दूर जाणे तुला जमते

साधी आठवणही नसेल, तुझ्यापाशी माझी
स्वप्नात येऊन मलाच, दुखावणे तुला जमते

तुझ्या अश्रूंची किंमत, मी मोजतच राहिलो
नात्यांच्या व्यवहारात हिशोब, चुकता करणे तुला जमते

घुटमळतोय अजूनही, त्याच तिठ्यावर मी
विसरून सारे सहज, मार्गस्थ होणे तुला जमते

स्वलिखित