सांजवाती

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 16, 2018, 11:42:00 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. सांजवाती*

आकाश आहे तुझ्यामुळे अपुरे गं
तुझ्याविणा सखे सांजवाती अधुऱ्या गं

तू पतंगा परी बागडत
आलीस दिपकाच्या उजेडात
इकडून तिकडे नेलंस जीवाला
टाकून गेली मनाला अंधारात

देखणी परी तू रूप तुझं गोजीर गं
तुझ्याविणा सखे सांजवाती अधुऱ्या गं

दिमाखात उभी तू दारात
सखे जीव झुरतो मळ्यात
गवताच्या पाती डोलतांना
आस लागली पडशील गळ्यात

चाहुलीत तुझ्या त्या पातींची मदार गं
तुझ्याविणा सखे सांजवाती अधुऱ्या गं

रात किड्यांची किर्रर्र किर्रर्र
झुळझुळू झऱ्याचा आवाज
मनाची होते घालमेल सखे
जसा वाजतो टाळ, मृदुंग,पखवाज

नाचते मन वाऱ्यावर गाणं होत तयार गं
तुझ्याविणा सखे सांजवाती अधुऱ्या गं

त्या काळाच्या नजरेत पडलो
हाताच्या रेषा उन्मळून पडल्या
राख झाली माझ्या मढ्याची
सावडतांना राशी साऱ्या रडल्या

केले कायमचे तू समाजातून हद्दपार गं
तुझ्याविणा सखे सांजवाती अधुऱ्या गं

✍🏻(कवी. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

*तुमच्या मनातला विरह कवी*