माझे नाव कोठे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 17, 2018, 10:04:34 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. माझे नाव कोठे*

हृदयात तुझ्या माझे सारे गाव खोटे
ओठांवर तुझ्या आज ही माझे नाव कोठे

लपलीस तू मला पाहून
रात सारी सरली वाटेत
नाही आलो पुन्हा मी त्या
काटेरी आठवणींच्या वाटेत

जखम झाली हृदयाला अन ते घाव खोटे
ओठांवर तुझ्या आज ही माझे नाव कोठे

सलणाऱ्या काट्यांना
उगाचं का दोष देऊ
झोक्यावर ना कोण माझं
झोका देण्या कशाला जाऊ

प्रेम असण्याचे तुझे ते सारे भाव खोटे
ओठांवर तुझ्या आज ही माझे नाव कोठे

काय झाले बदल तुझ्यात
अंतरात रूप तुझे का पाहू
क्षम्य झाली मनाची बाजू
अंधारात उगाच का राहू

मनात मी तुझ्या असल्याचे दाव ही खोटे
ओठांवर तुझ्या आज ही माझे नाव कोठे

सांग ना तू मला एकदा
भेट मनाच्या दारात पुन्हा
सांग समजून सारे ते
जे प्रेम केले हाच का गुन्हा

ओळखण्यात चुकलो मी तुझे डाव खोटे
ओठांवर तुझ्या आज ही माझे नाव कोठे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

*तुमच्या मनातला विरह कवी*