उगाच

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 18, 2018, 06:38:24 AM

Previous topic - Next topic
*शिर्षक. उगाच*


बुद्धीला पटणारे टाळले मी उगाच
अर्ध्यात हात सोडणारे पाळले मी उगाच

छिन्न विच्छिन्न झाल्या नात्याच्या भिंती
नात्याची नाळ तोडणारे पाळले मी उगाच

हिसकावून का घेऊ धर्म मी माणुसकीचा
माणुसकी जोडणारे ते जाळले मी उगाच

माणुसकी जात माणसाची निघाली खोटी
ते काळिमा फासणारे पाळले मी उगाच

खाक झाले घरटे सारे जे प्रेमाचे होते
आग लावणारे नरके पाळले मी उगाच

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील)
मो.९६३६०४०९००.अहमदनगर