हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

Started by siddheshwar vilas patankar, April 18, 2018, 12:15:48 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

तिच्या आवडीनिवडीसाठीच 

मी मैत्रीलाच गहाण ठेवलं

ते बोलावयाचे नेहेमी मजला

यायला सांगायचे नाक्यावर

एकही धड वाटत नव्हता तिला

एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं

शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा

नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं

त्यांना खबर पोहोचताच याची

सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं

लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं

चंडी रूप धारण करून मग तिनं

सर्वांचंच पायताण करून टाकलं 

प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला

अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच  बरा वाटला

नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं

उमजता मज मेख सारी

सालं प्रेमाचं रूप भयाण वाटलं

समजावून थकलो सर्वाना ,

पण कुणाला मी तिच्या हातातलं श्वान वाटलं

तर कुणाला तिचं पायाखालचं बारदान वाटलं

वेळ गेली, काळ गेला , आधी मला नाव ठेवायचे 

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं



सिद्धेश्वर विलास पाटणकर

??? ??? ??? ;D ;D ;D :D :D :D ??? ??? ???



सिद्धेश्वर विलास पाटणकर C