नशिबाला रंगत नव्हती

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 21, 2018, 10:55:00 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक.नशिबाला रंगत नव्हती*

स्वप्न पडते रातीला सारी तुझीच होती
हाताच्या रेषांवर नशिबाला रंगत नव्हती

रात्र सरून गेली या
कुशीवरून त्या कुशीवर
पहाट झाली कोंबडा अरवला
पाणी फिरलं साखर झोपेतल्या स्वप्नांवर

सारवलेल्या अंगणात दुःख रांगोळी होती
हाताच्या रेषांवर नशिबाला रंगत नव्हती

लिंपतांना भिंती अन
दारावर नक्षीदार तुझं चित्र
पाहिलं का तू मनातलं
दुःखानं विखुरलेल्या रानाचं चित्र

इरल कापड अन नक्षी ठिगळाची होती
हाताच्या रेषांवर नशिबाला रंगत नव्हती

लुडबुड करत ठुमकत चालतांना
उडणाऱ्या पदराच्या नक्षीत
चाहूल माझ्या असण्याची
पायातील पैंजनाच्या सुरात

प्रेमाच्या सूर तालाची झुंबड झाली होती
हाताच्या रेषांवर नशिबाला रंगत नव्हती

दिसतेस तू सावळी जरी
पाना फुलात सजलेली कळी
स्पर्श होता तुझा मनाला
भिडनारी नयनाला चंद्रकोर भाळी

भिडणाऱ्या नयनात तुझी साद नव्हती
हाताच्या रेषांवर नशिबाला रंगत नव्हती


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

*तुमच्या मनातला विरह कवी*