संध्याकाळ

Started by HARSHALA BHUSKUTE, April 22, 2018, 05:51:53 PM

Previous topic - Next topic

HARSHALA BHUSKUTE

आठवते का तुला ती संध्याकाळ।।
तू आणि मी समुद्रकिनारी बसलो होतो
त्या मंद प्रकाशात दिपून गेलो होतो।
त्या फेसळलेल्या लाटा जणू अंगावर धावून येत होत्या।
आपल्या हळुवार स्पर्शाने हुरळून जात होत्या।।
मी मात्र फक्त तुलाच पाहत होते।
तुझ्या अलगद होणाऱ्या स्पर्शाने मोहरून जात होते।।
आठवतंय का तुला।।।

मग असाच खूप वेळ गेला त्या सुंदर निसर्गाला निरखून।
आणि आपण सुद्धा चालत राहिलो एकमेकांचा हात धरून।।

तेव्हाच एक जाणीव झाली आपल्या अतूट नात्याची।
तिथेच सुरवात झाली होती आपल्या खऱ्या प्रेमाची।।

आठवतंय ना तुला।।

आता ही रेशीमगाठ कधीच तुटणार नाही।
अशी ती प्रेमळ संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही।।

अशी ती प्रेमळ संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही।।।
😘😘🙏🏼🙏🏼☺☺[/b]