शृंगार पापणीचा

Started by शिवाजी सांगळे, April 23, 2018, 07:59:37 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शृंगार पापणीचा

बावरले मी मनोमनी
क्षण असाच आला,
पाहण्या हो मजला
अवचित तो आला !

नसताच ध्यानी मनी
गाली रक्तिमा आला,
हलकेच कटाक्ष देता
ह्रदयी भूकंप झाला !

पापण्यांचा आज या
लाजरा शृंगार झाला,
चेहरा तो प्रियतमाचा
पहील्यांदाच पाहिला !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९