दिवसांच चांदण पडलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 24, 2018, 10:46:56 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. दिवसांच चांदण पडलं*

तुझा चेहरा अन माझं मन वेड झालं
सांग ना का हे दिवसांच चांदण पडलं

तू चालत येतेस ना जेव्हा
मनाची तार छेडून येतेस
संपून जाते काळी रात्र
अन तू स्वप्नातली परी होतेस

प्रेमाकडे बाजू कलली मन चिंब न्हालं
सांग ना का हे दिवसांच चांदण पडलं

नकळत जवळून जातेस
हळुवार स्पर्श करतेस
वेडावून जात मन माझं
जेव्हा तू मनात बसतेस

का अस मला तुझ्या सौंदर्यानं छळलं
सांग ना का हे दिवसांच चांदण पडलं

गार हवेची झुळूक येते
श्वासात सुगंध दरवळतो
नजर भिरभिरु लागते
मनाचा माझ्या ताबा सुटतो

अस वाटलं माझं आयुष्य परत मिळालं
सांग ना का हे दिवसांच चांदण पडलं

गोड गोड बोलून
मनाशी खूप खेळतेस
आता बास कर जवळ ये
का अस जीवाला जाळतेस

तुझ्या या खेळण्यानं जगणं तसंच राहिलं
सांग ना का हे दिवसाचं चांदण पडलं


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर