हुरहूर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 25, 2018, 07:06:28 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक.हुरहूर*

तुझ्या नक्षीदार साडीची किनार
मनावर करते खोलवर वार
खूप झाली सौंदर्याची किमया
तुझ्या प्रेमाचा आता झालाय भार

सूर्य तापला आता चटके देतो भुईला
कोमल स्पर्श तुझा झालाय यार
कोण होतीस तू मला काही कळेना
जातोय तोल थोडा दे ना आधार

लपू नकोस साजने मला पाहून
बोलून टाक ना आता मी आहे तयार
घे मिठीत आता कायमच मला
ओठांची तुझ्या चाखू दे साखर

दिवस लांबले आता भेटण्याचे
मी तुझा ढोल तू माझी सतार
लागू बंध आपुले मिळू दे आता
खेळू पुन्हा संसाराचा जुगार

नको करुस आता वेडेपणा तू
आकार देईल जीवनाला होऊन सुतार
नको जाऊस आता साजने दूर
खूप दिवसांचा आहे मी बेजार

होना एकदाच या वेड्याची तू
होशील का माझी नदी मी होतो सागर
बोलून टाकतो एकदाचं तुला मनातलं
तुझ्यावरचं आहे माझ्या जगण्याची मदार

हुरहूर का अशी लागली मनाला
होशील एकदा माझ्या समोर साकार
सणा सुदीच्या दिवसात अर्धांगिनी तू
स्वप्न आहे माझे देणार नाही तू नकार

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर