तुझ्यासारखं परत कोणीच भेटलं नाही,

Started by snangareopan@gmail.com, April 28, 2018, 10:11:09 AM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

तुझ्यासारखं परत कोणीच भेटलं नाही,

कधी मी असाही जगलो
तू सोबती असताना अबोलच  राहिलो ,
आज त्या अबोल क्षणांना घेऊन
परतीच्या वाटेने परत चाललो ,
निसटले काही क्षण नकळत
हरवलं मन त्या वाटेवर ,
नाराजहि झालं मन
त्या हरलेल्या क्षणांवर,
पाणावल्या पापण्या मग
दुःख मात्र अबोलयात थांबलं ,
ओसंडली आसावे डोळ्यातून
प्रेम दुराव्याने विरहाला डांबलं,
सुटले हात कधी हातातून
अजूनही कळलंच  नाही
अजूनही तुझीच वाट बघतात डोळे
काय सांगू-------------?
तुझ्यासारखं परत कोणीच भेटलं नाही,
             --------सोपान  नांगरे

सूरज कांबळे

     स्वप्न,

तूच आहेस तूच राहणार
या लेखनी ची तू शाही नाही
की सारख बदलत जाणार

कवि:-: सूरज कांबळे