पुतळा बोलु लागला...

Started by Deokumar, April 28, 2018, 12:55:17 PM

Previous topic - Next topic

Deokumar

पुतळा बोलु लागला....

घनदाट मेघ भरून आले
विजांनी आकाश सारे चमकु लागले
सोसाट्याचा वारा सुटु लागला
अन् चौकातला पुतळा बोलु लागला

कशासाठी लढलो, कुणासाठी झिजलो
हे आता कळेनासे झाले
लढलो आम्ही माणसाच्याच हक्कांसाठी
उभारून वेगवेगळे पुतळे जातीपातीत आम्हांस विभागले

लढलो आम्ही ना जातीसाठी ना धर्मासाठी
समाज एक करण्यास जीवन सारे घालवले
ज्ञानाची मशाल पेटवुनि अज्ञानाचा अंधार दूर केला
पाहून लोकांचा वेडेपणा पुतळा बोलु लागला

पाहुन जातीपातीतील विभागणी
पुतळ्याच्या डोळ्यात आले पाणी
नका करु आमच्यावर अन्यायाचा घाला
पुसत आसु पुतळा बोलु लागला
                          :-देवकुमार
                        सुभानपुर बुलढाणा
https://dattagumatkar.blogspot.in