जाणीव माझी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 01, 2018, 11:00:41 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. जाणीव माझी*


गुंडाळून ठेवतील ना गं कफनात पांढऱ्या
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी

कंठात शब्द अडकतील
रक्त ही गोठेल ना माझे
नसा नसा नाव तुझं घेतील
व्यापून जाईल नयन तुझे

हिरवागार शालू नेसून तू बहरशील ना गं
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी

अश्रूंची दाटी होईल नयनात
अंतर कमी होईल गाला पर्यंत
ओठांवर नाव माझे येईल
थेट त्या माझ्या सरणा  पर्यंत

मन बावर होऊन चालणं अवघड होईल
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी

नाही मिळणार चालण्यास जागा
फुलं होतील तिरस्काराचे
उधळून देतील माझे सगे सोयरे
तुझ्या माझ्या राख झालेल्या प्रेमाचे

शेवटचा घास भरवत मुखात जगशील ना
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी

लोटून जातील दिवस सारे
दुःखानी भरलेल्या भाकरीने
टोपल्यास नाही राहणार सुवास
सुखाच्या त्या इवलेशा चतकोराने

चालत रहा पुढे कोणाकडे लक्ष न देता
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी

नैव्यद्य ठेवतील ना विधीला
काक स्पर्श नाही होणार
स्पर्श कर फक्त हळुवार त्यास
जगलो कसा तुला जणीव होणार

शेवट होईल मग फोटोच्या हरा पर्यंत
नाही होणार आवर्जून आठवण गं माझी


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर