का असं घडावं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 02, 2018, 01:36:56 PM

Previous topic - Next topic
*शीर्षक. का असं घडावं*

तुझ्यावर त्या चांदरातीन का रुसावं
का असं घडावं मनाला ना ते दिसावं

रातराणी देऊन गेली सुगंध
तशी तू मनाला भावलेली
मंगळ सूत्राच्या मण्यांची नक्षी
त्यात तू पूर्णपणे भरलेली

नकळत सारे घडतांना मन हे फसावं
का असं घडावं मनाला ना ते दिसावं

दिलासा मी पाहत होतो
तू पुन्हा येशील मंदिरात
पायरी ती असेल पुन्हा
भीक मागेल मी पदरात

साठवणीतल्या आठवणीतं दुःख नसावं
का असं घडावं मनाला ते ना दिसावं

कोडेच होते जगण्याचे
अवघड झाले सोडवतांना
घाव झाले खूप हृदयाला
प्रेम बंध आपुले जोडतांना

वर वरच्या प्रेमावर मन माझं फसावं
का असं घडावं मनाला ते ना दिसावं

सांडलेल्या अक्षदांवर
नाव तुझे कोरलेले
रोज होते वरात माझी
नशेचे रोपटे मनात पेरलेले

शेवट केलेल्या आठवणींत तू का रहावं
का असं घडावं मनाला ते ना दिसावं

सात फेरे घेशील तू
आस होती बांधलेले
सारे बंध गेले लयास
तुझ्यासाठीचं होते तोडलेले

ना मिळणार कोणी असं सारं का सांडाव
का असं घडाव मनाला ते ना दिसावं


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर