तुझा डोळ्यात मी प्रेम शोधत होतो Please feedback kalava.. thank you

Started by maheshs25, May 02, 2018, 05:47:33 PM

Previous topic - Next topic

maheshs25

तुझा डोळ्यात मी प्रेम शोधत  होतो

तू नेहमी विचारात होतीस ना
काय बघतोस माझा डोळ्यात
तर मी म्हणत होतो
खूप सुंदर आहेत हे डोळे
पण
खरंतर मी तुझा डोळ्यात प्रेम  शोधत होतो
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम

त्या डोळ्यांत खूप स्वप्नं होते
भविष्याचे सुंदर दृश्य होते
नव्हतं तर फक्त प्रेम ..
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम

त्या डोळ्यात खोलवर जख्मा होत्या
अश्रूंना रोखणारा एक अभेद्य बांध होता
नव्हत तर फक्त प्रेम
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम

त्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती
स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक होती
नव्हतं तर फक्त प्रेम
तुझं माझ्यावर असलेलं प्रेम

click here for More https://www.youtube.com/watch?v=0qpfK7Jv0-k&list=PLj89zqZAuKnk9ZB3cep4bGMj0rQVfYuvx