आजकाल तु माझ्यासाठी खूप काही करतेस

Started by ऋषिकेश यादव, May 06, 2018, 12:05:34 AM

Previous topic - Next topic

ऋषिकेश यादव

आजकाल तु माझ्यासाठी खूप काही करतेस

आजकाल तु माझ्यासाठी खूप काही करतेस
सतत माझाच विचार करतेस
गप्पागोष्टी माझ्यासोबत करतेस
भेटीसाठी माझ्या तु झुरतेस
मला सर्वस्वी तुझंच मानतेस...

ओठांवर नाव फक्त माझं आणतेस
माझं हृदय,मन,श्वास..तुझेच म्हणतेस
दुरावाताच विरहात हुंदका फोडतेस...

जखम होता मला किती तु रडतेस
माझ्यासाठी सर्वकाही विसरतेस
अगदी काही दिवसांनी स्वतःच्या मित्र-मैत्रिनींना सोडायला तयार होतेस...

मला सर्वस्वी तुझाच नवरा मानतेस
माझ्या तोंडून मनापासून ऐक ना बायको हा शब्द ऐकून घेतेस...

सुख दुखं माझी अलगद तु झेलतेस
माझ्या आवडी-निवडी हळूवार तू माझ्याकडून जाणून घेतेस...

माझ्यासाठी स्वतःलाही विसरतेस
आज सलतो मला तुझा परिक्षेसाठीचा दुरावा
का ऐवढं प्रेम तु माझ्यावर करतेस...

                                             __ऋषिकेश यादव