आई

Started by snangareopan@gmail.com, May 08, 2018, 09:30:40 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

आई...........

पहिला श्वास घेतला
अन आता नवीन जग बाघायच होतं ..,
मात्र नियतीचा डाव वेगळा होता
तिला हे सुख मान्यच नव्हतं ....,
तिच्या कुशीची उब अन
चेहऱ्यावरचं हास्य मला कळत नव्हतं
नुसताच श्वास घेतला होता
अन नियतीने तिला आपलं केलं होत ...
फोडला टाहोही अन
तरसलो तिच्या कुशीला
हे देवा .......,
जर तिलाच ठेवायचं नव्हतं
तर जन्म तरी का दिला?
साऱ्या विश्वाला पुरून उरेल
एवढ तीच प्रेम असावं..,
अन हेच सुख देवा
मग माझ्याच नशिबी का नसावं ?
आज तिला शोधताना
हृदय कस भरून आलंय,,,,
आयुष्यभराचं दुःख मात्र
तिच्या नसण्याने दिलंय ...
डोळे कसं भरतात तिच्या नसण्याने
कधी तू हि रडून बघ कि
नाही मी कोणाचा आता
हे देवा.....,
मग मला पण घेऊन चल कि?

--------------------सोपान  नांगरे