कुचके धागे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 09, 2018, 06:53:47 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक. कुचके धागे*

सावली समजून भिरभिर
भिरायचो तिच्या मागे
कोण जाणे काय होणार
सारे होते जोडलेले कुचके धागे

मागितलं होतं एकदा तिला
आयुष्याची हो जोडीदार
विस्कटलेल्या त्या फुलांवर
का बांधला मी उघड्यावर संसार

रात राणी तू होतीस
अंगणात माझ्या शोभेची
सुगंध होता दरवळत नेहमी
भीती वाटत होती चोराची

का झालीस परकी पुन्हा
साद घातली प्रेमाची
उंबरा माझा पोरका झाला
तोडलीस अट उंबरा ओलांडण्याची

राख झाली पुन्हा मैफिल
प्रेमाचे घुंगरू ही तुटले गं
डोळ्यांची किनार माझ्या
त्यात अश्रू सारे आटले गं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर