एक रुपयाचं नाण

Started by Jak, May 09, 2018, 02:48:54 PM

Previous topic - Next topic

Jak

तू माळलेल्या गजऱ्यातल मोगऱ्याच फुल
रात्रभर आपल्या गोष्टी ऐकत बसलेलं छोटस मुल..
त्याला कधीच कळल नसेल आपल नात काय होत
आपण दोघांनी एका रात्रीसाठी घर मांडल होत..
मेहंदीने एकमेकांच्या तळहातावर ओरखडलेल्या रेषा
तुझ्या माझ्या मनात रंगलेली प्रेमाची भाषा..
तेव्हाच तू मला दिलेलं एक रुपयाच नाण
रात्रभर हातात हात घेऊन दोघांच जगण..
तुझी माझी तेव्हडीच आठवण माझ्याकडे आहे
मोगऱ्याच्या फुलाला त्या रात्रीचा सुगंध आजही आहे..
आणि हो ते एक रुपयाच नाण आजही मी वापरतो
ठरवण्यासाठी कि तुझ माझ्यावर प्रेम आहे कि नाही..
नकार कधीच मला मिळाला नाही
कारण माझ्यासाठी दोन्ही बाजू होकाराच्याच असतात..
                                               - @SP..