तर्क

Started by नास्तिक, May 11, 2018, 12:10:34 AM

Previous topic - Next topic

नास्तिक

 विश्वनिर्माता तो,
शून्य महाशून्य तो.
तो अमर, तो अनंत.
का कैद केलंय त्यास,
मंदिरा मस्जिदात?
कोणता धोका त्यास,
त्याच्याच जगातात?

परमात्म्याची ओढ तुम्हाला,
दगडांत त्याचा शोध तुम्हाला.
शोधून पाहू एकदा चला,
आपल्या मनात.
रक्ताचे आश्रु गाळत असेल,
तो अंधाऱ्या कोपऱ्यात.

प्रश्न करेल मग तो आपल्याला,
की आपण प्रश्न का न केला?
त्याने दिलेल्या तर्कबुद्धीचा,
वापर आपण का न केला?

वर्षानुवर्षे जपत का आलो,
या ढोंगी रुढी परंपरांना?
त्याच्या नावे चीरत का आलो,
आपल्याच भावांच्या गळ्यांना?

भक्ती उगाच करू नको रे,
खोट्या देवा-बुवांची रे.
राज्य करण्याची युक्ती ती फक्त,
तर्क करूनीया तूच पहा रे.

-पार्थ