दुष्काळ

Started by @गोविंदराज@, May 20, 2018, 04:27:02 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

प्रेमळ माणसांनी वसलेललं माझं एक गाव,
कलंबर (खु.)  त्या तीर्थक्षेत्राचं नाव...

ओसाड रानं आणि पिकांचे सापळे,
दुष्काळाच्या झळीने जीव तळमळे,...

तप्त झळा आणि बोचरया कळा,
सुकलाय जणु धरतीचा गळा...

सुकलेले ओठ, आटलेले पोट,
डोईवर सुर्य ओकतो ज्वाळांचे लोटं..

घोटासाठी पायदळी पिळवटलेल्या वाटा,
तापलेली माती आणि पायी बोचणारा काटा..

गावात दुष्काळ मुक्कामी राहुन लोळत होता,
मुक्या जीवांना छळता छळता आकाशाला पोळत होता...

लहान थोर आता कष्ट करीती अहोरात्र,
डोळ्यापुढे हिरवळीची आस एकमात्र...

पाणी फाउंडेशन च निमित्त झालं,
जिव्हाळ्याचं गणित मात्र असिमितं झालं...

हातात हात आणि मनाला मने अशी प्रित जुळाली,
निसर्गालाही माझ्या गावची रीत कळाली...

चोहीकडे बहरुन यावी हिरवळ,
हिच आहे प्रत्येक मनाची तळमळ..

माय बाप बंधु भगिणींचे कष्टरुपी परोपकार,
निसर्गाला अनिवार्य आहे आता माझ्या गावचा उध्दार..

हिरव्या अच्छादनाची लागलेली आस,
हुकेल कशी यंदा धान्यांची रास?

खारीचा तर कुणाचा सिंहाचा वाटा,
होईल जमीन सुपीक, वाढेल पाण्याचा साठा..

आता झिरपेल भेगा भेगातुन पाणी,
पुन्हा होईल मग एकसंध धरणी...

आता गर्भप्रफुल्लीत ती मेघ सुंदरी  वरूण भेटीला ऊत्सुक होईल,
माझ्या गावचा पत्ता विचारत ती आपसुक येईल..

- गोविंदराज
21/05/2018