मनाच्या एका कोपऱ्यात

Started by surajrathi, May 21, 2018, 03:54:42 PM

Previous topic - Next topic

surajrathi

मनाच्या एका कोपऱ्यात
आज पण तुच आहेस
तुज हसन तुज रुसून बसन ,
आजपण  तुला मनवायला,
मला खूप खूप आवडत

जेव्हा एखाद्या वेळेस एकटा असतो,
तेव्हा तुलाच आठऊण  माझ्या,
चेहर्‍यावर नकळत हसु येत,
नजरेला  थोडासा वेळ का होईना,
सोबत असल्याचा भास मनाला होतो,
तु काही मन पण खरच आजपण,
मनाच्या एका कोपऱ्यात तुच आहेस

तु आली आयुष्यात माझे भान हरपून गेले,
कळले नाही मला कधी  मी तुझ्यात गुंतत गेलो,
जेव्हापासून तुझ्या  प्रेमात मी हरवून गेलो,
कळले नाही कसा शब्दांशी खेळू लागलो
तुला नसेल पटत पण खरच आजपण
मनाच्या एका कोपऱ्यात आज पण तुच आहेस

वेगवेगळ्या भावनांना तु माझ्या मनात जन्म देतेस,
माझ्या हातून सार काही तुच लिहून घेतेस,
माझी कविता म्हणजे तुझा न माझा संवाद असतो,
मी फक्त तुझ्यावरच वेड्यासारखं प्रेम करतो,
कवी नाही मी हे माझं प्रेम आहे,
माझ्या मनातील भावना फक्त कवितेतून व्यक्त मी करतो,
चार दोन कविता करून प्रेम थोडच थांबणार आहे,
माझ सांगण कदाचित तुला पटत नसेल,
पण खरच आजपण मनाच्या एका कोपऱ्यात तुच आहेस

                                                       -सुरज राठी