तो..

Started by Deokumar, May 23, 2018, 08:41:26 AM

Previous topic - Next topic

Deokumar

तो...

तो मंद वारा
मनाला अलगद स्पर्श करणारा
देऊन आठवणींची झुळुक
तो सतत वाहणारा

उमटवुन पाऊले वाळुवर
समोर चाललो मी खरा
सोबत नसले कुणीही
मात्र सोबती वाटतो तो किनारा

झाली ही सांजवेळ
झाला रिकामा हा किनारा
पसरला जरी अंधार सर्वत्र
तरी वाट दाखवी तो अंधुक प्रकाश

जाता जाता या किनाऱ्याने
मनाला शांत करी हा वारा
चंद्राच्या शांत प्रकाशाने
उजळुन निघाला तो किनारा
               :-देवकुमार
         सुभानपुर बुलढाणा