बकेट लिस्ट

Started by शिवाजी सांगळे, May 25, 2018, 01:10:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बकेट लिस्ट

आयुष्य थोडं आहे
म्हणून का म्हणायचं?
हे करायचं राहिलं..!
ते करायचं राहिलं..!
तसं तर आयुष्यात काहीच नाही उरलं...
उरल्या त्या... अपार ईच्छा
राहिली ती... अनेक स्वप्ने
एकदा सहज त्यांची यादी काढली...
मग काय...
बादलीच की भरली...!
तरीही एकाद ईच्छा उरली.
होतात का पुर्ण ईच्छा
अशी यादी काढल्यावर?
माझी यादी मी काढू शकतो...
त्या काढलेल्या यादीचं काय?
पुर्ण करावी मी...
म्हणून ईतरानी काढलेली
आणि
पेंडीगला मी ठेवलेली...?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९