सुख- अर्थ

Started by Sagar Thombare, May 26, 2018, 01:07:45 PM

Previous topic - Next topic

Sagar Thombare

दुष्काळग्रस्त कर्जाचे ओझे असणारा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो, त्याचा मुलांवर येणारे संकट व त्यांना किती दु:खांचा सामना करावा लागतो त्याचे वर्णन या कवितेत केले आहे.
आवडल्यास नक्की share करा.
तो मुलगा देवाला नेहमी प्रार्थना करतो व म्हणतो.....

           सुख- अर्थ

हे देवा ....
सुखाच्या भुकेला दु:खाची भाकर
त्यातही तिर्स्कराची साखर,
घास देतोय सुखाचा तर पोटात घालवं
समुद्राच पानी सुद्धा गळ्यात गिळवं,
सुख या शब्दांचा अर्थ आता तरी कळवं.

माय-बाप हिसकावूनी तुनी वाडीत मला टाकले
अंगी दारिद्र्य देवूनी तुनी मला छळले.
वृक्षपरी बाप नि मायेची सावली दाखवं,
प्रेम या शब्दाचा अर्थ आता तरी कळवं.

दुष्काळाने नेले पिक सावकाराने शेती
खंडित घर ही देखील देतोय थोडा धीर.
जवळ आपल्या तु एक विसावा दाखवं,
घर या शब्दाचा अर्थ आता तरी कळवं.

दफ्तराचे ही ओझे आता पुराने नेले
आवडते पुस्तक माझे वाऱ्यानी फाडले
विद्येची तहान आता कुठेतरी बुझवं,
ज्ञान या शब्दाचा अर्थ थोडा तरी समजवं.

दुःखानी दुखवले ,दुःखानी दाखवले
माणसे आपले नि परके आपले,
आपूलकिच्या दिव्याची वात आता तरी जळवं
सुख या शब्दांचा अर्थ आता तरी कळवं.

                              -- सागर प्र.ठोंबरे