जागतिक पचन स्वास्थ्य दिन

Started by कदम, May 29, 2018, 09:32:25 AM

Previous topic - Next topic

कदम


उत्तम आहार उत्तम पेय
सर्वांनी करावे प्राषण
बिघडवू नये निकृष्ठ अन्नाने
आपल्या शरीराचे पोषण

सुस्थितीत चालेल आपली संस्था पचन
निरोगी शरीराला द्या,उत्तम आहाराचे वचन

शरीराला लावावे एकच व्यसन
रोज एक तास करावी योगासन
होऊ नये शरीराचे कुपोषण
करावे दिवसातून तीन वेळा जेवण

सुस्थितीत चालेल आपली संस्था पचन
निरोगी शरीराला द्या,उत्तम आहाराचे वचन

उघड्यावरील अन्न खावु नये
जंताना आमंत्रण देवू नये
हातांची नखे कधी वाढवू नये
सकाळी-सध्याकाळी दात घासणे विसरु नये

सुस्थितीत चालेल आपली संस्था पचन
निरोगी शरीराला द्या,स्वच्छतेचे वचन

पालेभाजी नित्य नेमाने खावी
तेलकट पदार्थ नेहमी टाळावी
आवश्यक तेवढी काळजी घ्या पोटाची
समस्या उद्भवणार नाही अपचनाची

सुस्थितीत चालेल आपली संस्था पचन
निरोगी शरीराला द्या,उत्तम आहाराचे वचन