आठवणी

Started by snangareopan@gmail.com, May 31, 2018, 08:36:38 AM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

आठवणी 
आठवणी आठवताना कधी
एक चेहरा आठवला
शिंपल्यातून हळूच मोती निघावा
तसा डोळ्यातून थेंब  बाहेर आला

आयुष्याच्या वाटेवर आज
आठवणीचे  किनारे उभे होते
किती आले अन किती गेले
बरेच चेहरे आठवणीत होते

कुणी साथ दिली होती
कुणी लांबूनच पाहिलं होतं
काहींनी वार केले होते
शेवटी आपलं असं कोणीच नव्हतं

कधीतरी आठवणीत बुडावं
चुकलं कोणाचं ते आठवावं
भेट अजून एकदा व्हावी
अन हृदय भरून यावं

आठवणींच्या या कहाण्या
आठवनीतच राहाव्यात
आठवणी आठवता आठवता
आठवणीच होऊन जाव्यात
                         सोपान नांगरे
                         BVCPK

Parshuram Mahanor

आठवणींच्या या कहाण्या
आठवनीतच राहाव्यात
आठवणी आठवता आठवता
आठवणीच होऊन जाव्यात...

Nice lines...