भावनांना रूप

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 02, 2018, 07:05:07 AM

Previous topic - Next topic
*शीर्षक.भावनांना रूप*

दुःख हे झाले आता माझ्या मनी खूप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

येशील म्हणून मोजले
नाही अंतरीचे घाव
नाही केले प्रेम कधी
हे एकदा पुन्हा दाव

का दिलास मला देवा असा हा शाप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

वेळ गेली निघून आता
मिळाली नाही मुक्ती
त्या दवा वाणी झाली
मला गवताची सक्ती

दिल नाही देखणं काही हेंच एक पाप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

झुळूक वाऱ्याची
बऱ्याचदा येऊन गेली
पण तू येण्याची कधी
भनक कशी ना आली

कधी मोजून देशील आपल्या मधले माप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

कठोर होत गेलीस तू
श्रीमंतीला तुझ्या पाहून
एकदा तरी दिलंस का
प्रेम तू मनात तुझ्या राहून

दोर आपला दुराव्याचा आता तरी काप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

अस दूर राहून तू
दुरावा वाढत गेला
प्रेमाचा झरा का
असा आटत गेला

खुप दिवसांचा हा डोक्याला जुना ताप
दे रे आभाळा दे रे मुक्या भावनांना रूप

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर