शिसं.

Started by Parth Banpatte, June 04, 2018, 03:09:22 PM

Previous topic - Next topic

Parth Banpatte

शिसं


टाचा घासूनि शिथिल पडला,
मृतदेह अंधारात.
माफ कर रे भिमा तू आम्हां,
न पूसता आली ही जात.

लिंबू मिरच्यांमध्ये अडकलो
भविष्य शोधितो नक्षत्रांत
माफ कर रे विनू तू आम्हां,
न विज्ञाननिष्ठा या मनात.

वाईटास आम्ही रे आज पूजतो,
दुष्टता बाळगतो मनामनांत.
कसं सांगू रे मोहन तूजला,
आम्ही फोल असहकारात.

एकाची आस्था कारणीभूत,
दूसरऱ्याच्य जीवित हानिस.
भगत तूझ्या जिवाची धडपड,
ना कळली या समाजास.

तत्वांच्या गप्पा मारतो आम्ही,
कुजक्या आत्म्याच्या अस्तित्वात.
सत्कारही करतो तत्ववाद्यांचा,
शिसं ठोकून काळजात.


http://trytothinkofit.blogspot.com/
https://m.facebook.com/parth.banpatte