माझे गाव

Started by HARSHALA BHUSKUTE, June 05, 2018, 10:54:39 PM

Previous topic - Next topic

HARSHALA BHUSKUTE


माझं गाव आहे मिठगावणे।।
जिथे वसली आहेत साधारण चारशे एक घरे।।

माझं गाव म्हंटलं तर फार छोटं आहे।
पण तिथल्या लोकांचे एकमेकांशी घट्ट जिव्हाळ्याचे नाते आहे।।

गाव म्हटलं की तिथलं लहानपण आठवतं।।
तिथला प्रत्येक क्षण आठवून वेडं मन बावरत।।

लहानपणी काहीच समजत नव्हते।।
पण तरीही तिथे जाऊन राहणे मनाला मात्र रुचत होते।

आजी आणि आण्णा सतत सोबत असायचे।
त्यांच्या सोबतीत सगळे दिवस भुर्रकन निघून जायचे।

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आनंदाला उधानच असायचे।
आंबा फणस खाऊन खाऊन पोट फुटून जायचे।

सगळी भावंडं एकाच वेळी ह्याच महिन्यात भेटायची।
मुंबईत सगळी चार दिशांना असली तरी गावाला एकाच ठिकाणी भेटायची।।

आजीच्या हातची सांदण आणि फणसाची भाजी।
काय वर्णन करू त्याचे सुगरणच होती माझी आजी😋😋।।

आंबे कसे चोखून खायचे हे ही शिकवले अण्णा नि।।
पण ते किती फस्त झाले हे कधीही नाही मोजले त्यांनी।।

आजी अण्णांना मदत करण्यात वेळ निघून जायचा।
आणि बघता बघता मे महिना पटकन संपून जायचा।।

मग पुन्हा मुंबईला परतण्याची वेळ यायची।।
आणि पावले अलगद परतीच्या वाटेला लागायची।

असं हे गाव कायमच आठवणीत असते।
आजी अण्णांच्या आठवणींनी आता ते सदैव मनात वसते।
आजी अण्णांच्या आठवणींनी आता ते सदैव मनात वसते।।।

Harshala Bhuskute
h.harsha112007@gmail.com