लग्न एक विश्वास की धोका

Started by sneha31, June 05, 2018, 10:56:52 PM

Previous topic - Next topic

sneha31

लग्न एक विश्वास की धोका

लग्न म्हणजे बाहुला बाहुलीच खेळ नव्हे तर
संपुर्ण आयुष्यच न सुटलेलं एक कोडं आहे
अनोळखी माणसावर केलेलं एक विश्वास आहे
पण खरंच का विश्वास जिंकणार?

लग्न म्हणजे दोन मनाचं एक मिलन
कधी ओळख नसतांना मिळालेलं धोरण
दुसऱ्यांना आपलं म्हणून स्वीकारणार आव्हाहन
पण खरंच का आपल म्हणून स्वीकारणार?

लग्न  म्हणजे सात जन्माचं बांधलेलं एक बंधन
आई बाबांची लाडकी परकं करुनि जाते अंगण
परक्यांच्या घरात जाऊन लक्ष्मी ती बनणार
पण खरंच का हक्काचं ते असणार ?

लग्न म्हणजे आयुष्याला मिळणारी नवी वाट
संघर्षाच्या वाटेनं सुरू होणारी नवीन पहाट
सगळ्यांच मन जपुन सुरू करणार नवीन संसार
पण खरंच का आपल म्ह्णून स्वीकारणार  ?

लग्न म्हणजे संपुर्ण आयुष्याची रंगवलेली स्वप्नं
काल्पनिक विचारातले मनातिल अनोळखी भाव
जिंकलं तर विश्वास नाही तर मनावर घातलेला घाव
पण खरंच का ते स्वप्न सत्य होणार ?

स्नेहा माटूरकर
भंडारा