स्मृती

Started by Dr sunil jayant kulkarni, June 06, 2018, 01:26:16 PM

Previous topic - Next topic

Dr sunil jayant kulkarni

  आवरून अश्रू स्मृतीला तव करितो मी वंदन
हृदयाच्या वेदनाही पडल्या अपुऱ्या स्पर्शिता तव चरण
करुनिया आपली स्वप्ने साकार
कठोर राहिला जर बाह्यकार
तव  हृदयी होते वात्सल्य अपार
स्मृतीनी या चिंब होतात मम् नयन
आवरून अश्रू स्मृतीला तव करितो मी वंदन// १
सहन केलीत अपार दुःखे
दुसर्यांना मात्र दिलीत सुखे
सर्वांसाठी एवढ्या झिजला
अखेर तो छंदांची लाजला
सतत तुम्ही ग्रीष्म पहिला ना पहिला श्रावण
आवरून अश्रू स्मृतीला तव करितो मी वंदन // २
जरी देह तुमचा इथे नसे
खंत आम्हा हि असे
वागावे  कुठे कसे
उपदेश तुमचे करिती  मार्गाचे दर्शन
आवरून अश्रू स्मृतीला तव करितो मी वंदन //३
तुम्ही सतत हसत राहिला
हसतच जगाला निरोप दिला
अशीच प्रार्थना ईश्वराला
हसतच राहू दे तव आत्म्याला
वाहतो तुजला आता हे काव्यपुष्प सुमन
आवरून अश्रू स्मृतीला तव करितो मी वंदन // ४


डॉ सुनिल जयंत कुलकर्णी