आस

Started by शिवाजी सांगळे, June 08, 2018, 04:48:45 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आस

तृषार्त धरेस या आसक्ती
होत आहे नभ थेंबाची,
मिलन विरह या दोहोंचा
परंपरा हि युगा युगाची !

स्पर्शासवे मृद्गंध खुलावा
पुर्तता व्हावी अपुर्णतेची,
येताच कवेत परस्परांनी
अनुभूती व्हावी पुर्णतेची !

टिपावे धरेने घन थेंबाना
घेत अवीट गोडी अमृताची,
चिरंतन जपावी स्मृती मग
फुलवित हरित पात्यांची !

विसरूनी बंध, पाश सारे
आवर्तने हो एकरूपतेची,
वर्षावात तृप्त होती गात्रे
आस तुझ्या पुनर्मिलनाची !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९