🌊🌊 सागर 🌊🌊

Started by Hemlata Sapkal, June 08, 2018, 06:19:12 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

🌊🌊 सागर 🌊🌊

पाहता त्या सागराकडे!
ऐकता त्याची पहाडी गाज!
मनात उठले वादळ अनेक विचारांचे!!

कधी लागेल याचा थांग!
काय दडले यांच्या पोटात!!

शंख, शिंपले,मासे,रत्ने,
तेल,मीठ अन् बरेच काही!!

जेव्हा मानव नव्हता अवघा हावरट!
  तेव्हा सृष्टी होती अवघी सुखात!!

  आता काय झाले...
माणसाने केल्या सीमा पार!
नाही उरला कोणताच पारावार!!

     एक दिवस त्याने
सागरालाच बनवले आपले लक्ष!
घेतले त्याचे खूप ओरबाडे,
केले त्याला भक्ष!!

    मग तो ही खवळला
एक दिवस सगळा कचरा  ओकला !
आणि त्यांच्याच अंगावर टाकला!!

काय चूकले त्याचे तुम्हीच सांगा!
पाहता त्या सागराकडे तुम्हाला काय वाटते??

              हेमाराणी