बाहुले

Started by शिवाजी सांगळे, June 12, 2018, 04:55:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बाहुले

कशाचा लोभ, कशी आसक्ती!
गुंतवते मात्र मोह माया सारी,
उमजून सत्य भास आभासाचे
माणूस स्वतःस का न सावरी?

मनावर ताबा! विचार कसा?
मर्त्य मानव, श्वासांची उधारी,
घेवुन, देवून ज्ञान जगताला
रोखतो का जन्म मृत्यू वारी?

ज्ञात अज्ञात का म्हणावी गूढ?
ही पंचमहाभूतांची हेराफेरी,
कळेच ना जाणता अध्यात्म
नियतीचे बाहुले आहोत सारी!

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९