अस का वाटते?

Started by Kavita sangra, June 15, 2018, 01:53:44 PM

Previous topic - Next topic

Kavita sangra

वेध घेणारी तुझी नजर का मला
      भेदुन जाते
तुलाच शोधणार्या पापण्याना
    खाली झुकवून टाकते
हाताच्या घट्ट स्पर्शाने का
   अंग माझे रोमांचीत होते
हव्याहव्याशा त्या स्पर्शाने
   मीच मोहरून जाते
तुच केलेल्या स्तूतिने का
   ओठांची थरथर होते
सांडलेले शब्द कानात साठवताना
   गालावर लाली उमटवून जाते
तुझ्या अस्तित्वाने सुवासलेली
       संध्याकाळ
का मनाला तरुण बनवते
अन् मला ही कविता
      तुलाच का
अर्पण करावीशि वाटते.
   
                   -कवीता संग्रस कन्हेरिकर