त्या वळणावर...

Started by शिवाजी सांगळे, June 16, 2018, 09:31:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्या वळणावर...

आठवतोय तुला
वाफाळलेला चहा?
हळूच ओठ चावल्यावर...

रेंगाळता पाऊस
घोटाळणारी पावलं
फिरून त्याच वाटेवर...

भानावर आलो
तेव्हा, असून छत्री
पार चिंब भिजल्यावर...

भेट व्हायची 
बघ आपली, नेमक्या
त्याच त्या वळणावर...

विसरावा कसा
ओलेता जिव्हाळा
पाऊस हा बरसल्यावर...

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९