तात्या

Started by Asu@16, June 17, 2018, 11:10:27 AM

Previous topic - Next topic

Asu@16

प्रस्तावना - 1970 आणि त्या आधीच्या काळात जळगावच्या एम.जे. कॉलेजच्या ऑफीसचे सर्वेसर्वा हेडक्लार्क तात्या सिंगनूरकर, एक वल्ली !
त्यांच्या स्मृतीस अर्पण.

तात्या


सदरा धोतर टोपी काळी :-*
खांदी छत्री सर्वकाळी
करकर करकर ताल धरी
पायी वहाण कोल्हापुरी
पातळ बांधा काया गोरी
कोट काळा शोभे त्यावरी
प्रसन्न चेहरा उंच मूर्ती
पाहता देई सकला स्फूर्ती
अखंड बडबड, शब्द दनादन
मुखी ठेविली जणू मशीनगन
घर ते ऑफिस फास्ट गाडी
थांबेना कुठेही थोडी
लवकर पोहचुनि उशीरा निघते
घंटे विना ही गाडी चालते
रेकॉर्ड यांचे तोंडपाठ
माहिती साठी ना उघडे कपाट
भीड ना कुणाची, कामा वाघ
प्राचार्यांसह सर्वां धाक
कॉलेज सुटता मुलांशी बात
निवांत कामाची होई सुरवात
पास कुणाचा, कुणा नादारी
कामे उशीरा बिनपगारी
वर्गात जरी नसे हजेरी
यांच्या वर्गी गर्दी सारी
हेडक्लार्क जरी अनेक असती
तात्या आमचे कुठे ना दिसती
अशी माणसे होणे नाही
चिरा ना पणती त्यांची काही
दिव्यासम जे अखंड जळती
तेल संपता विझून जाती
वंदन माझे अशा प्रभूती
आठवण ज्यांची कुणी न करती

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita